पिंपरी l प्रतिनिधी
गुटखा विक्री प्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपरी येथे आणि चाकण पोलिसांनी चाकण येथे कारवाई केली. यामध्ये सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याबाबत गुरुवारी (दि. 14) पिंपरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
चाकण पोलिसांनी मिनाज जलालउद्दीन ताल्लुकदार (वय 25, रा.महाळुंगे) याला गुटखा विक्री प्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून आठ हजार 193 रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 13) दुपारी दीड वाजता रेणुका हॉटेल महाळुंगे येथे करण्यात आली.
सामाजिक सुरक्षा विभागाने पिंपरी गाव येथे गुरुवारी (दि. 14) कारवाई केली. त्यात पोलिसांनी हितेश जितेंद्र मायारामाणी (वय 24), सुनील उर्फ आबू गंगाराम जेसवाणी (वय 55), राकेश मुलचंद आडवाणी (वय 46, तिघे रा. पिंपरी गाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या ताब्यातून 54 हजार 87 रुपयांचा गुटखा, पाच हजार 200 रुपये रोख रक्कम आणि 60 हजारांची एक दुचाकी असा एकूण एक लाख 19 हजार 287 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.