क्रिडाताज्या घडामोडीपुणे

नवल टाटाकडून गुरू अकॅडमी पराभूत, अनवर हॉकी सोसायटीचा एकतर्फी विजय

५ वी एसएनबीपी अखिल भारतीय १६ वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धा

पुणे | नवल टाटा हॉकी अकॅडमी व अनवर हॉकी सोसायटी संघांनी अनुक्रमे गुरू हॉकी अकॅडमी व ओटीएचएल इलेव्हन संघाचा पराभव करून 5 वी एसएनबीपी अखिल भारतीय 16 वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धेत आपली विजयी घौडदौड सुरू केली.एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर आजपासून सुरू झालेल्य या स्पर्धेचे उद्घाटन हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे पुत्र व ध्यानचंद पुरस्कार विजेते अशोक कुमार यांच्या हस्त झाले.

यावेळी एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या अध्यक्षा व नेहरू हॉकीच्या उपाध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, एसएनबीपी ग्रुपच्या संचालिका ऋतूजा भोसले, प्राचार्य विभाकर तेलोरे, आयोजन समितीचे समन्वयक फिरोज शेख उपस्थित होते.सकाळी झालेल्या ब गटातील सामन्यात जमशेदपूर येथिल नवल टाटा हॉकी अकॅडमी संघाने हरियाणा येथिल गुरू हॉकी अकॅडमी संघाचा 3-1 गालने पराभव केला. शालेय राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या टाटा अकॅडमी संगाच्या खेळाडूंनी सुरूवातीपासून नियोजन पूर्वक खेळ करण्यास सुरूवात केली. अचूक य जलद पासिंग करून त्यांनी गुरू अकॅडमी संघाच्या खेळाडूंना अनेक वेळा चकविले.

टाटा अकॅडमी संघाच्या अभिषेक तिग्गाने २६ व्या मिनिटाला पहिला गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यांच्या टॉपनोजोलीनने 32 व्या मिनिटाला दुसरा व रोशन इक्काने तिसरा गोल केला.

पराभूत गुरू हॉकी अकॅडमीचा ,कमेव गाल संदीपने 50 व्या मिनिटाला केला. दुसऱ्या लढतीत उत्तर प्रदेशच्या अनवर हॉकी सोसायटी संघाने दिल्लीच्या ओटीएचएल संघाचा 8-0 गोलने धुव्वा उडविला विजयी संघाकडून दानिशने 17 व 49 मि. असे दोन गाल केले.

त्यांच्या मिथिलेश पटेलने 3 मि., अर्शने 18 मि., ओंकार पटेलने 29 मि., आरिशने 39 मि. व अमनने 50 मि. यांनी प्रत्येकी एक गोल केला. तिस ऱ्या सामन्यात भिलवाडा हॉकी अकॅडमी विरूध्द स्मार्ट हॉकी अकॅडमी, रायपूर यांच्यातील लढत 1-1 गोल बरोबरी संपली. स्मार्ट अकॅडमीकडून अमन कुमारने 6 व्या तर भिलवाडा अकॅडमीकडून रोहित जातावने 50 व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली.

चौथ्या सामन्यात केरळचा पीएमएसएएमएएचएसएस चा संघ उपस्थित राहू न शकल्यामुळे कोलकाता वॉरियर्स संघाला पुढे चाल देण्यात आली.

निकाल :
ब गटात (बी) : नवल टाटा हॉकी अकॅडमी : 3 गोल (अभिषेक तिग्गा 26 मि., टॉपनोजोलीन 32 मि., इक्का रोशन 53 मि.) वि. वि. गुरू हॉकी अकॅडमी ; 1 गोल (संदिप 50 मि.);

ह गटात (एच) : अनवर हॉकी सोसायटी, उत्तर प्रदेश : 8 गोल (दानिश 17 व 49 मि. 2 गोल, मिथिलेश पटेल 3 मि., अर्श 18 मि., ओंकार पटेल 29 मि., आरिश 39 मि, अमन 50 मि. यांनी प्रत्येकी एक गोल) वि. वि. ओटीएचएल इलेव्हन, दिल्ली) : शून्य गोल;

क गटात (सी) : भिलवाडा हॉकी अकॅडमी : 1 गोल (रोहित जाताव 50 मि.) बरोबरी वि. स्मार्ट हॉकी अकॅडमी, रायपूर : 1 गोल (अमन कुमार 12 मि.)

ज गटात (जी) : कोलकाता वॉरियर्स संघाला पुढे चाल देण्यात आली.
==============================

एसएनबीपी सस्थेतून भारतीसाठी चांगले खेळाडू मिळतील : अशोक कुमार
एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच माध्यमातून ज्या प्रकारे शालेयस्तरावर हॉकी खेळासाठी प्रोत्सहान दिले जाते आहे, त्यामुळे आगामी काळात भारतीय हॉकी संघाला नक्कीच चांगले खेळाडू मिळू शकतील. शालेयस्तरावर या प्रकारच्या स्पर्धा होणे गरजेचे आहे. एसएनबीपीचा हा उपक्रम उल्लेखनीय आहे, असे अशोक कुमार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button