breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

गुजरात विधानसभा निकाल ः कमळ फुलले, भाजपचे नेतेमंडळी खुलले

भाजपच्या ऐतिहासिक विजयाची काय आहेत कारणे ?

अहमदाबाद । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विक्रम मोडित काढला आहे. १९८५ मध्ये काँग्रेसने १५० जागा जिंकून इतिहास रचला होता. मात्र गेल्या ३७ वर्षांत कुठल्याही पक्षाला इतक्या जागा जिंकता आल्या नव्हत्या. गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. दीडशेहून अधिक जागांवर भाजपने विजयी आघाडी घेतलेली आहे. तर काँग्रेसची ऐतिहासिक घसरण झाली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतची आकडेवारी पाहता भाजप १५४, काँग्रेस १८, आप ६ तर इतर ४ जागांवर विजयी किंवा आघाडीवर आहेत.

भाजपने ही मुसंडी मारताना काँग्रेसचा विक्रमही मोडित काढला आहे. १९८५ मध्ये काँग्रेसने दीडशतकी जागा जिंकून इतिहास रचला होता. गेल्या ३७ वर्षांत कुठल्याही पक्षाला १५० हून अधिक जागा जिंकता आल्या नव्हत्या. अगदी गेली २७ वर्ष सत्तेवर असणाऱ्या भाजपलाही ते जमलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ मध्ये भाजपने १२७ जागा जिंकल्या होत्या. हा भाजपने आतापर्यंत पटकवलेल्या जागांचा कमाल आकडा होता. मात्र यावेळी भाजपने सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

भाजपच्या विजयाची सहा कारणं
१. प्लॅनिंग जोरदार – भाजप परीक्षा तोंडावर आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणाऱ्यांपैकी नाही. जोरदार प्रचार सभा, सुरुवातीपासूनचं नियोजन या बळावर भाजपने विजय प्राप्त केला. गुजरात हा गेल्या २७ वर्षांपासून भाजपचा गड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे गुजरात जिंकणं हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे.

२. बडे चेहरे मैदानात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करत एकूण ३० प्रचारसभा आणि रोड शो केले. तर, गृहमंत्री अमित शहा जवळपास दोन महिने तळ ठोकून प्रचाराचे बारकाईने नियोजन करत होते. याशिवाय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही प्रचारसभा घेतल्या होत्या.

३. अँटी इन्कम्बन्सीवर मात – सलग सहा वेळा, गेली २७ वर्ष भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविषयी जनतेत रोष निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र ही गोष्ट २०१७ मध्येच ओळखून भाजपने त्यावर वेळीच मात केली. अनेक जागांवर नवे चेहरे दिले, जवळपास ३० टक्के विद्यमान आमदारांचे तिकीट कापले, तर काही महिन्यांपूर्वी भाजपने गुजरातमधील संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा प्रयोगही केला होता.

४. विरोधक काँग्रेस निष्प्रभ – गुजरातमध्ये विरोधीपक्ष काँग्रेसची फारशी ताकद दिसली नाही. निवडणुकीत पक्षाची पुरती दाणादाण उडाली आहे. १७९ जागांवर उमेदवार देऊनही जेमतेम २० जागा पक्षाला खिशात घालता आल्यात. मत विभाजनाचा फटका काँग्रेसला बसल्याचं बोललं जात आहे.

५. आम आदमी पक्ष – ‘आप’ला गुजरातमध्ये फारशी चमक दाखवता आली नसली तरी त्यांनी आपली दखल घ्यायला लावली आहे. आप ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार होत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या प्रेझेन्सचा भाजपला फायदा झाल्याची चर्चा आहे

६. स्ट्रॅटेजी यशस्वी – पाटिदार समाजाचं आंदोलन शमवून त्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आलं. पाटिदार समाजाचं नेतृत्वच खेचून घेतल्याने समाजातील एकगठ्ठा मतंही भाजपकडे आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button