breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम, उपमुख्यमंत्री यांची माहिती

मुंबई – महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळू-हळू ओसरत आहे. त्यामुळे राज्य ससरकार कडक केलेले निर्बंध शिथिल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतू कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देशात सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे यावर्षीही बकरी ईदसाठी मागिल वर्षाप्रमाणेच धोरण असणार असल्याचं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

आज अजित पवार यांनी पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला भेट दिली. त्याठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधा व साधनसामग्रीचा आढावा घेतला. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सरकारकडून नागरिकांना सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे, आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जायला सज्ज असलो, तरी पुण्यात निर्बंध कायम राहणार असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button