breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नवरात्रीत गरबा, दांडिया खेळण्यास बंदीराज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई – यंदा 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवरात्रौत्सवासाठी नियमावली जारी केली असून नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावली त म्हटले आहे की,सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासनांची त्यांच्या धोरणानुसार परवानगी घेणे आवश्यक राहील. यासाठी ऑनलाईन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे.

पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी. नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्षिशत करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे, शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करावी. देवीच्या दर्शनाची सुवधिा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

आरती, भजन आणि किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे पालन करण्यात यावे. मंडपात एकाचवेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल. दसर्‍याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्य तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक आदी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button