TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मैदाने, उद्यान, पर्यटन स्थळे बंद; राज्यात नवी नियमावली जाहीर

मुंबई | आज राज्यात ४१ हजार पेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली असून मुंबईतही २० हजार बाधित सापडले आहेत. कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने सरकारने कठोर निर्णय घेतला असून राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान रेल्वे प्रवासासाठी कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. १० जानेवारीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत.

काय आहेत नियम?

राज्यात रात्री ११ ते ५ संचारबंदी

मैदाने, उद्यान, पर्यटन स्थळे बंद

शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार

पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं वाहतूक करण्यास मुभा.

महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक.

हॉटेल्स रेस्टॉरंटमध्येही पूर्ण लसीकरणं झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलीव्हरी सेवा पूर्णवेळ सुरु राहणार.

एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाईल.

24 तास सुरु राहणारी कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार.

दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांच्या दोन्ही कोविड प्रतिबंधक लसी झालेल्या असणं बंधनकारक.

लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार.

आज किती रुग्ण वाढले?

राज्यात आज तब्बल 41 हजार 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9 हजार 671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button