breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

Ground report: चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून संदीप चिंचवडे निवडणुकीच्या तयारीत! 

विधानसभा निवडणूक मोर्चेबांधणी: मतदार संघात महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या वाढली

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीचा माहोल शांत होण्यापूर्वीच शहरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे पडघम घुमू लागले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून (अजित पवार गट) माजी नगरसेवक संदीप चिंचवडे यांनी निवडूक लढण्याचा निर्धार केला असून, आपला मित्र परिवार आणि नातेवाईकांना आवाहन करणारी ‘पोस्ट’ केली आहे. 

या पोस्टद्वारे चिंचवड विधानसभा मतदार संघातील शाश्वत विकासाची संकल्पना, सूचना आणि मार्गदर्शन करावे, असे आवाहन चिंचवडे यांनी केले आहे. त्याबाबत ‘महाईन्यूज’च्या हाती संबंधित सदर पोस्ट लागल्यानंतर त्याची शहानिशा केली आहे.  

ॲड. संदीप चिंचवडे हे उच्च शिक्षित असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. २०१२ ते २०१७ या काळात ॲड. चिंचवडे पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांच्याकडे प्रदेशस्तरावरील जबाबदारी मिळाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मला सक्रीय व्हायचे आहे. त्यासाठी चिंचवड विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास निश्चितपणे लक्षवेधी कामगिरी करणार आहे. त्यासाठी आप्तेष्ट, मित्र परिवार यांच्या सूचना, सल्ला आणि मार्गदर्शन मिळावे. या करिता व्यक्तीगत स्वरुपाची पोस्ट मी केली होती, असा दुजोरा ॲड. संदीप चिंचवडे यांनी दिला आहे. 

ॲड. संदीप चिंचवडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 

प्रिय मित्रा …
लहानपणापासून आपण सर्व एकत्र शिकलो हिंडलो फिरलो अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या कधी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झालो कधी भेटणे जमले नाही तरी पण एकमेकांबद्दल असच प्रेम जिव्हाळा राहिला काही जण आपल्याला सोडून गेले त्याचे दुःख सर्वांना आहेच
आपण एकमेकांना मदत करत करत आपण चालत राहिलो
मित्रांनो तुमचा एक जवळचा मिञ आज महत्वाचा आणि अवघड पण अशक्य नाही असा निर्णय घेत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी मी निर्णय घेतलेला आहे. त्यासाठीच मी चिंचवड विधानसभा निवडणूक 2024 लढविण्याचा दृढ निश्चय केला आहे.
तुमच्या आजपर्यंतच्या ज्ञानाची कामाची अनुभवाची मला खरंच खूप गरज भासणार आहे. आपण आपल्या परीने मला शक्य तितकी मदत करावी असे मनापासून वाटत आहे.
तुमचा एक मित्र महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडण्यासाठी,महाराष्ट्राचा सर्वांगीण शाश्वत असा विकास करण्यासाठी लढणार आहे.तुम्हा सर्वांची साथ मला हवी आहे आणि तुम्ही ती द्यालच याचा विश्वास आहे 

आपला, 

ॲड. संदीप चिंचवडे
मा. नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका
उपाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश

महायुतीतील इच्छुकांमध्ये आता रस्सीखेच… 

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चिंचवडमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. महायुतीमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, भाजपाचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर आणि आता ॲड. संदीप चिंचवडे यांनीही तयारी सुरू केली आहे. तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले असे संभाव्य इच्छुक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button