पिंपरी / चिंचवड

कुदळवाडीत किराणा दुकान आणि घर फोडले

पिंपरी l प्रतिनिधी

कुदळवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान आणि दुकानदाराचे घर फोडले. दुकानातून किराणा माल, रोख रक्कम, तसेच घरफोडी करून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले. ही घटना 27 एप्रिल ते 23 मे या कालावधीत घडली.

दिपाराम रामाजी चौधरी (वय 46, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबियांसह पाली राजस्थान येथे लग्नानिमित्त गेले होते. पवारवस्ती कुदळवाडी येथे फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. फिर्यादी हे गावी गेल्यानंतर त्यांचे दुकान आणि घर कुलूप लाऊन बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून कुलूप तोडले. दुकानातून किराणा सामान आणि रोख रक्कम चोरली. तसेच  दुकानाच्या पहिल्या मजल्यावर फिर्यादी यांचे घर आहे. घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असा एकूण 45 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button