पिंपरी / चिंचवड

गुटखा विक्री प्रकरणी किराणा दुकानदाराला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

विकासनगर येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट पाचने किराणा दुकानावर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा जप्त करून दुकानदार तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 22) रात्री साडेसात वाजता करण्यात आली.

चनाराम मंगीलाल देवासी (वय 26, रा. किवळे, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आरोपीचे विकासनगर येथे किराणा मालाचे दुकान आहे. त्याने दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी रविवारी रात्री दुकानावर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी तीन हजार 518 रुपयांचा गुटखा जप्त केला. दुकानदार देवासी याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button