ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना अभिवादन

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या सांगवी येथील पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन रावसाहेब मिसाळ, प्रदीप जाधव,सचिन गायकवाड, विजय कोपरे,रमेश कर्डीले, अजय असूटकर, विजय सिंग, अर्चना राणे, अंजू नायर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे राज्यात शेती, सहकार, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे थोर राजकारणी होते, असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button