महापालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले.
उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आदी उपस्थित होते.
अहिंसेचा संदेश व शिकवण सर्वाना देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि साधी राहणी, नम्रता तसेच दृढ विश्वास असे अलौकिक व्यक्तिमत्व लाभलेले भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचा वारसा भावी पिढीने जोपासावा असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.