breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लहान मुलांच्या लसीरकरणाला हिरवा कंदील, बूस्टर डोसलाही परवानगी; मोदींनी केल्या महत्वाच्या घोषणा

नवी दिल्ली | प्रतिनिधी 
कोरोनाचा संसर्ग हळूहळू पुन्हा एकदा वाढत जात आहे. त्यातच ओमायक्रोन विषाणूची भीतीही वाढत जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या.

नरेंद्र मोदी म्हणाले की, 15 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणास 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, अनेक देशात ओमायक्रॉनचे संकट वाढले आहे. भारतातही हा संसर्ग वेगाने फोफावत आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे. भारतानं आतापर्यंत 141 कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.

तसेच, देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत. ५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत. १ लाख ४० हजार आयसीयू बेड्स आहेत. देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत. ४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत. राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत. चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button