breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मोठा दिलासा : पिंपरी-चिंचवडमधील १० लाख नागरिकांचे लसीकरण

पिंपरी । प्रतिनिधी

शहरातील 10 लाख नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. महापालिकेने लसीकरणाचा दहा लाखाचा टप्पा पार केला आहे. आजमितीला शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या टप्प्यावर आहे. यापैकी लसीकरणाचा आकडा निम्म्यावर पोहचल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 189 नवीन कोरोना बाधित रुग्णांची मंगळवारी नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 431 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 796 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 336 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 63 हजार 802 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 796 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 189 रुग्ण गृहविलगीकरणात असून 607 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 39 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 410 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 155 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 10 लाख 4 हजार 612 जणांनी लस घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button