breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरकार पाच वर्षे टिकेल – शरद पवार

  • पेट्रोल दरवाढ, सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून होणाऱ्या धाडसत्रांवरुन सडकून टीका
  • “पुन्हा यायचे काही जमेना” म्हणत फडणवीस यांच्यावर मजेशीर टीका

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मी पुन्हा येईन, पण पुन्हा यायचे काही जमेना, असे म्हणत पवार यांनी फडणवीस यांच्यावर मजेशीर टीका केली आहे. “तुम्‍ही काहीही करा, हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल” असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार दोन दिवसाच्या पिंपरी-चिंचवड दौ-यावर आहेत. आज (शनिवारी) आकुर्डी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे यांच्यासह आदी पधिकारी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी- चिंचवडमध्ये शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्रावर सडकून टीका केली. सीबीआय, ईडी, आयकर विभागाचा गैरवापर होत आहे. जे सरकार केंद्र सरकारच्‍या विचारांचे नाही, त्‍या सरकारला या यंत्रणेच्‍या वापर महाराष्‍ट्र, तामिळनाडू, प. बंगालमधील सरकार अस्‍थिर करण्‍यासाठी होत आहे. लोकप्रतिनिधी दडपणाखाली ठेवण्‍यासाठी काम सुरु आहे, असा आरोपही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तसेच अस्वस्थ झालेले हे लोक सत्तेचा गैरवापर करून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ईडी, एनसीबीच्या या कारवाया द्वेषापोटी होत असल्याचे ही पवार या वेळी म्हणाले.आता राज्‍यातील सरकार स्‍थिर आहे. त्‍यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार अस्‍थिर करण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. तुम्‍ही दवाबतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्‍ही काहीही करु शकता. तरीही आघाडी सरकार आपलाकार्यकाळ पूर्ण करेलच, असा विश्‍वासही शरद पवार यांनी व्‍यक्‍त केला.

“पुन्हा यायचे काही जमेना”
महाविकास आघाडी सरकारला आता २ वर्ष पूर्ण व्हायला आली, पण तरी हे लोक म्हणतात हे सरकार टिकणार नाही. तसेच काही लोक निवडणुकांसाठी सतत सांगत होते ‘मी येणारच पण ते येणारच हे काही जमेना’ असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानावर टीका करताना हे उदगार काढले आहेत.

केंद्र सामान्य माणसाला महागाईत ढकलत आहे

यावेळी शरद पवार यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल हे उत्पन्न वाढवण्याचं साधनच आहे असा केंद्राचा दृष्टिकोन झाला आहे. जेव्हा आम्ही दरवाढ केली तेव्हा भाजपने दहा दिवस संसदेचं कामकाज रोखलं होतं. असे म्हणत त्यांनी केंद्र सामान्य माणसाला महागाईत ढकलत आहे अशी ही टीका केली.

छापा टाकला की पाच दिवस पाहुणचार घेतला

अजित पवारांच्‍या तीन बहिणीच्‍या मालमतेवर छापा टाकण्‍यात आले. छापा टाकणारे घरात एक ते दोन दिवस राहिले ठीक आहे. पण पाच दिवस १५ माणसांनी छापा टाकला. त्‍यांचे हे वागणे बरोबर होते का. तुम्‍हीच तिथेच थांबा, असा आदेश त्‍यांना फोनवरुन येत होता. एखाद्‍याच्‍या घरी १५ माणसं पाठवणे योग्‍य आहे का, चौकशी करण्‍याचा अधिकार आहे. काम संपल्‍यानंतर किती दिवस पाहुनचार करणार, वरुन आदेश असल्‍यामुळे ही मंडळी पाच दिवस बसून होता, असेही पवार यावेळी म्‍हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button