ताज्या घडामोडीमुंबई

गुगल शोधणार बेवासर वाहने,गुगल-शोधणार-बेवासर-वाहने

मुंबई |  प्रतिनिधी

रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या करण्यात येत असलेल्या बेवारस वाहनांचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिका आता ‘गुगल’ची मदत घेणार आहे. पालिकेच्या २४ विभागांतून जप्त केलेली ही वाहने माहुल येथे ठेवण्यात येणार आहेत. यासाठी माहुल येथे जागा निवडण्यात आली आहे.

अरुंद रस्ते आणि रस्त्यांच्या दुतर्फा अवैध पार्किंग यामुळे मुंबईत नेहमीच वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून बेवारस वाहने उचलून ती विभाग स्तरावरील गोदामात जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत ३ हजार ७००हून अधिक बेवारस वाहने जप्त करण्यात आली आहेत. बेवारस वाहन रस्त्यावर दिसल्यास त्या गाडीवर नोटीस चिकटवण्यात येत आहे. या कार्यवाहीनंतर महिन्याभरात वाहन मालकाने प्रतिसाद न दिल्यास त्या गाडीचा रितसर लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बेवारस वाहनांचा लिलाव करत पालिकेच्या तिजोरीत महसूल जमा करणे हा कारवाईचा उद्देश नसून रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, हे उद्दिष्ट असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी सांगितले. काही विभागांमध्ये जप्त केलेली वाहने जमा करण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे दोन ठिकाणी वाहनांचे डम्पिंग ग्राउंड सुरू करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. माहुलमध्ये यातील एका डम्पिंगसाठी सुमारे एक हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

करोनाकाळात ठप्प झालेली बेवारस गाड्यांवरील कारवाई महापालिकेने काही दिवसांपासून मोठ्या जोमाने सुरू केली आहे. वाहने उचलून नेण्याबाबतची कारवाई वाहतूक पोलिसांनी पूर्वीप्रमाणेच पालिका प्रशासनाकडे सोपविण्यासाठी पोलिसांकडे असलेली टोइंग वाहने पुन्हा पालिकेकडे आली आहेत. रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवलेल्या एकूण २ हजार ३८१ वाहनांच्या मालकांना पालिकेने काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. त्यापैकी ३७९ जणांनी वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त केली.

मोटारींसाठी २२ टोइंग व्हॅन

मुंबई व उपनगरांत पालिकेचे एकूण ३२ सार्वजनिक वाहनतळ आहेत. वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी विदर्भ इन्फोटेक प्रा. लि या कंपनीच्या टोइंग व्हॅन आहेत. दुचाकीसाठी २४ तर, मोटारींसाठी २२ टोइंग व्हॅन आहेत. तर दुचाकींसाठी जय मल्हार या कंपनीच्या ७ टोइंग व्हॅन तर मोटारींसाठी २९ टोइंग व्हॅन आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button