breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दिलासादायक बातमी! धारावीत आज कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

मुंबई – मुंबईत कोरोनाचा संसर्ग पसरला तेव्हा सर्वाधिक भिती होती ती धारावीची. धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला तर हाहाकार माजेल अशी भिती निर्माण झाली होती. त्यानंतर धारावीत कोरोनाचा शिरकाव झालाही. मात्र, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने धारावीत कोरोना संसर्ग अटोक्यात आणण्यात यश आलं आहे. आज धारावीत कोरोनाचा एकही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. जानेवारी २०२१ पासून आज पहिल्यांदाच कोरोनाच्या शून्य रुग्णाची नोंद झालीय

जी / उत्तर वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेनं जाहीर केली. या आकडेवारीनुसार, या वॉर्डमध्ये केवळ 9 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पहिल्यांदा एकही रुग्ण आढळून आला नाही. याआधी एक दिवस हा आकडा दोन वर होता. सध्या धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 861 इतकी आहे. तर दादरमध्ये 3 तर माहिममध्ये 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.

दादरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या 9 हजार 557 इतकी आहे. माहिममध्ये कोरोनाबाधितांची एकूण आकडा 9 हजार 876 वर पोहोचला आहे.जी/ उत्तर वॉर्डमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजार 294 इतका झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button