breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

Good News: Oxfordच्या ‘कोरोना’ लशीची मानवी चाचणी भारतात होणार

नवी दिल्ली: कोरोनावरच्या औषधावर भारतासह जगभर संशोधन सुरु आहे. जगात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनेका (Oxford-AstraZeneca COVID-19 vaccine) यांनी तयार केलेले औषध या औषधाच्या मानवी चाचणीला सुरुवात झालेली असून त्याच्या पहिल्या फेरीतले निष्कर्ष उत्साहवर्धक आल्याने सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता याच औषधाची मानवी चाचणी भारताती घेतली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या औषधाची शेवटच्या फेरीतली चाचणी भारतात होणार असल्याने त्याचा फायदा आपल्या देशाला होणार आहे. अशा प्रकारची चाचणी घेण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती DBTच्या सचिव रेणू स्वरुप यांनी दिलेली आहे. भारतात पाच ठिकाणी ही लस दिली जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहितीही स्वरुप यांनी दिली आहे. या औषधाचं उत्पदन करण्याची जबाबदरी पुण्याच्या ‘सीरम’ Serum Institute of India- SII या जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मात्या कंपनीकडे देण्यात आली आहे.

हा प्रयोग यशस्वी ठरला तर भारतात लवकरात लवकर औषध कसं पोहोचेल याची सरकार काळजी घेईल असंही सांगण्यात आलेले आहे. जगप्रसिद्ध लॅन्सेट मासिकात पहिल्या चाचणीबाबत एक अहवाल जाहीर झालेला आहे. त्यात ते निष्कर्ष देण्यात आलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button