TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

खुशखबर! मध्य रेल्वेच्या पॅसेंजरही पूर्ववत सुरु

पिंपरी चिंचवड | रेल्वे विभागाने सर्व रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी असलेली अनारक्षित पॅसेंजर (DEMU) रेल्वे देखील सुरु करण्यात येणार आहे. पुणे – सोलापूर, सोलापूर – वाडी, दौंड / पुणे – निजामाबाद, कुर्डूवाडी – मिरज, पुणे – कोल्हापूर, पुणे – दौंड आणि निजामाबाद – पंढरपूर या पॅसेंजर गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व पॅसेंजर गाड्या दहा डब्यांच्या असतील. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पॅसेंजर गाड्यांची तपशीलवार माहिती –

पुणे – सोलापूर
ट्रेन क्रमांक 01421 अनारक्षित 15 नोव्हेंबर पासून पुणे येथून दररोज सकाळी 08.30 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी 15.35 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01422 अनारक्षित 16 नोव्हेंबर पासून सोलापूर येथून दररोज 23.20 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 06.00 वाजता पोहोचेल.

थांबे – हडपसर, लोणी, उरुळी, केडगाव, दौंड, मलठन, भिगवण, जिंती रोड, पारेवाडी, वाशिंबे, जेऊर, भालवणी, केम, कुर्डुवाडी जं., वडसिंगे, माढा, वाकाव, अनगर, मलिकपेठ, मोहोळ, मुंढेवाडी, पाकणी

सोलापूर – वाडी
ट्रेन क्रमांक 01381अनारक्षित 16 नोव्हेंबर पासून सोलापूर येथून दररोज 00.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी वाडी येथे 04.05 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01382 अनारक्षित 16 नोव्हेंबर पासून वाडी येथून दररोज 06.45 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी 09.55 वाजता पोहोचेल.

01381 साठी थांबे – अक्कलकोट रोड, दुधनी, कुलाली, गाणगापूर रोड, सावलगी, कलबुर्गी, हिरेनंदुरू, मारतूर आणि शहाबाद.
01382 साठी थांबे – शहाबाद, मारतूर, हिरेनंदुरू, कलबुर्गी, बबलाद, सावलगी, हुन्सिहडगिल, गाणगापूर रोड, गौडगाव, कुलाली, दुधनी, बोरोटी, नागणसूर, अक्कलकोट रोड, तिलाटी, होटगी जं., टिकेकरवाडी.

दौंड – निजामाबाद
ट्रेन क्रमांक 01409 अनारक्षित 15 नोव्हेंबर पासून दौंड येथून दररोज 16.45 वाजता सुटेल आणि निजामाबाद येथे दुसर्‍या दिवशी 10.40 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01410 अनारक्षित 16 नोव्हेंबर पासून निजामाबाद येथून दररोज 23.40 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 19.00 वाजता पोहोचेल.

थांबे – उरुळी (फक्त 01410 साठी), दौंड, श्रीगोंदा रोड, विसापूर, अहमदनगर, राहुरी, बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, येवला, अंकाई, मनमाड, नगरसोल, रोटेगाव (फक्त 01410 साठी), करंजगाव (फक्त 01410 साठी), लासूर (फक्त 01410 साठी), औरंगाबाद, मुकुंदवाडी (फक्त 01410 साठी), बदनापूर, जालना, रांजणी (फक्त 01410 साठी), परडगाव (फक्त 01410 साठी), परतूर, सेलू, मनवत रोड (फक्त 01410 साठी), परभणी जं., पूर्णा जं., नांदेड, मुदखेड, उमरी, कारखेली, धर्माबाद, बसर

कुर्डुवाडी – मिरज
ट्रेन क्रमांक 01545 अनारक्षित 15 नोव्हेंबर पासून कुर्डुवाडी जंक्शन येथून दररोज 10.55 वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी 15.10 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01546 अनारक्षित 15 नोव्हेंबर पासून मिरज येथून दररोज 06.25 वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी जंक्शन येथे त्याच दिवशी 10.15 वाजता पोहोचेल.

थांबे – मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, वासूद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठे महांकाळ, सलगरे, बेळंकी, आरग

पुणे – सातारा
ट्रेन क्रमांक 01539 अनारक्षित 15 नोव्हेंबर पासून पुणे जंक्शन येथून दररोज 18.30 वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी 22.40 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01540 अनारक्षित 17 नोव्हेंबर पासून सातारा येथून 06.15 वाजता सुटेल आणि पुणे जंक्शन येथे त्याच दिवशी 10.25 वाजता पोहोचेल.

थांबे – सासवड रोड, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, आंबळे, राजेवाडी, जेजुरी, दौंडज, वाल्हा, निरा, लोणंद, साल्पा, अदारकी, वाठार, पळशी आणि जरंडेश्वर.

सातारा – कोल्हापूर
ट्रेन क्रमांक 01541 अनारक्षित 16 नोव्हेंबर पासून सातारा येथून दररोज 05.30 वाजता सुटेल आणि कोल्हापूर येथे त्याच दिवशी 09.55 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01542 अनारक्षित 16 नोव्हेंबर पासून कोल्हापूर येथून दररोज 16.55 वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी 21.50 वाजता पोहोचेल.

थांबे – कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, शिरवडे, कराड, शेणोली, भवानीनगर, ताकारी, किर्लोस्करवाडी, आमनपूर, भिलावडी, नांद्रे, माधवनगर, सांगली, विश्रामबाग, मिरज जंक्शन, जयसिंगपूर, निमशिरगाव टांडलगे, हातकणंगले, रूकडी, वाळिवडे

पुणे – दौंड (वन वे)
ट्रेन क्रमांक 01525 अनारक्षित 15 नोव्हेंबर पासून पुणे जं. येथून दररोज 09.40 वाजता सुटेल आणि दौंड येथे त्याच दिवशी 11.10 वाजता पोहोचेल.

थांबे – हडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, पाटस

निजामाबाद- पंढरपूर
ट्रेन क्रमांक 01413 अनारक्षित 16 नोव्हेंबर पासून निजामाबाद येथून दररोज 13.25 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी 04.30 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01414 अनारक्षित 17 नोव्हेंबर पासून पंढरपूर येथून दररोज 05.30 वाजता सुटेल आणि निजामाबाद येथे त्याच दिवशी 23.05 वाजता पोहोचेल.

थांबे बासर, धर्माबाद, कारखेली, उमरी, मुदखेड, मुगत, पाथरड, नांदेड, वानेगाव, लिंबगाव, चुडावा, पूर्णा जं., मिरखळ, पिंगळी, परभणी जं., सांगणापूर, पोखर्णी नरसिंहा, धोंडी, गंगाखेड, वडगाव निला, उखळी, परळी वैजनाथ, घाटनांदूर, मुर्ती, पानगाव, कारेपूर, जानवल, वडवळ नागनाथ, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, औसा रोड, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी जंक्शन, मोडनिंब.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button