Mahaenews

Gold Silver rates | सोनं, चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Monday gold silver price shows decrease move

Monday gold silver price shows decrease move

Share On

(Gold Silver) सोमवारी सोनं- चांदीच्या दरांत घसरण पाहायला मिळाली. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर, 300 रुपयांनी घसरला. तर, चांदीचे दर 266 रुपयांनी घसरले. गुरुवारीही हे दर 300रुपयांनी तर, शुक्रवारी तब्बल 2 हजार रुपयांनी उतरले होते.

कोरोना लसीच्या घोषणेनंतर सोन्या चांदीच्या दरांमध्ये बदल झाले होते. त्यानंतर अमेरिकेतील कॅपिटल हिंसाचाराचेही परिणाम या दरांवर दिसून आले. एमसीएक्सवर सोने 2086 रुपयांनी घसरलं, ज्यामुळं प्रतिग्रामसाठी हे दर 48818 रुपये असल्याचं निदर्शनास आलं. तर, प्रतिकिलो चांदीच्या दरातही कपात झाली. 6122 रुपयांची कपात झाल्यामुळं हे दर, 63850 रुपयांवर पोहोचले.

good returns संकेतस्थळानुसार सोमवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर 48480 रुपये इतके, तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49482 रुपयांवर स्थिरावले. दिल्लीत 22 कॅरेट सोन्यासाठी 48470 आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 52870 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर सातत्यानं घसरत आहेत. 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरानं 56 हजारांचा आकडा ओलांडला होता. ज्यानंतर आताचे दर पाहता जवळपास 13 टक्क्यांनी हे दर खाली उतरल्याचं म्हटलं जात आहे.

Exit mobile version