पिंपरी / चिंचवड
पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान सोन्याची पाटली लंपास
पिंपरी l प्रतिनिधी
च-होली फाटा आळंदी ते पिंपळे गुरव या दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना एका महिलेच्या हातातील सोन्याची पाटली अज्ञात चोरट्याने काढून चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत घडली.
विमल रघुनाथ चपटे (वय 61, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी सायंकाळी च-होली फाटा आळंदी ते पिंपळे गुरव या दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. बस प्रवासात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील दोन तोळे वजनाची 90 हजारांची सोन्याची पाटली हातचलाखीने काढून जबरदस्तीने चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.