TOP Newsक्रिडापिंपरी / चिंचवड

सुवर्णपदक विजेत्या पैलवान प्रगती गायकवाडचा सत्कार

पिंपरी l प्रतिनिधी

रांची येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चिखली येथील प्रगती विनोद गायकवाड हिला सुवर्णपदक मिळाले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल नगरसेविका निर्मला गायकवाड आणि स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी तिचा घरी जाऊन सत्कार केला.

रांची (झारखंड) येथील गणपतराय स्टेडियमवर 15 ते 17 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. प्रगती गायकवाड हिने 54 किलो वजनी गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. 54 किलो वजनी गटात 18 राज्यातील महिला कुस्तीगीर सहभागी झाल्या होत्या. पहिल्या फेरीमध्ये प्रगती गायकवाडने पंजाबच्या महिला पैलवान ख्वाईश हिला 10-0 ने मात दिली. दुस-या फेरीत चंदीगडची पैलवान काजल हिला 10-0 ने हरवले.

उपांत्यफेरीत दिल्लीची महिला पैलवान सिमरन हिच्यासोबत प्रगतीची चित्तथरारक लढत झाली. यात सिमरनला 8-5 अशा गुणांनी प्रगतीने आसमान दाखवले. अंतिम फेरीत हरियाणाची महिला पैलवान मुस्कानला एकतर्फी चितपट करून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

प्रगती गायकवाड ही पिंपरी-चिंचवडचा अभिमान आहे. अशा राष्ट्रीय खेळाडूला आपण प्रोत्साहन द्यायला हवे. प्रगती चिखली मधील घरकुल परिसरात राहते. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील ही खेळाडू आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक यादव म्हणाले की, प्रगती गायकवाड यांनी मुलगी असून कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे हे कौतुकास्पद आहे. यामुळे देशभरात शहराचे नाव झळकले आहे. तिने सांगतलेल्या अनुभवावरून आई-वडिलांची मिळालेली साथ आणि प्रशिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावर चालल्या मुळेच ती यश संपादन करु शकली. प्रत्येक मुलीने तिच्याकडून आदर्श घेऊन खेळामध्ये उतरून आई वडील यांची मान उंचावली पाहिजे. भारतीय जनता पार्टी ही देशभरात खेळाडूंसाठी अतिशय चांगल्या प्रकारचे काम करत आहे. खेळाडू हे देशाचा कणा आहेत. महानगरपालिकेच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहनपर योजना राबवल्या जातात. आमदार महेश दादा लांडगे हे पैलवान असल्यामुळे प्रत्येक खेळावर त्यांचे विशेष लक्ष असून खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा कशा दिल्या जातील ते बघत असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button