क्रिडाताज्या घडामोडीपुणे

जीओजी एफसीसी, जाएंटस उपांत्य फेरीत

पिंपरी चिंचवड | जीओजी एफसीसी आणि जाएंटस संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी दाखवत येथे सुरू असलेल्या सिटी कप 2021 फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सिटी एफ.सी. पुणे संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर सामने मोशी येथील सिटी फुटबॉल अरेनावर सुरू आहेत.कार्तिक राजूच्या हॅटट्रिकने जीओजी संघाने डायानामाईटसचा 4-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जाएंटसने अनुभवी गनर्स संघाचा 3-2 असा पराभव केला.कार्तिक राजूने आठव्याच मिनिटाला जीओजी संघाला आघाडीवर नेले. पण, त्यानंतर विश्रांतीपर्यंत म्हणजे मध्यांतराला त्यांना त्याच एकमात्र गोलच्या आघाडीवर समाधान मानावे लागले होते. उत्तरार्धात मात्र त्यांनी वेगवान खेळ केला. कार्तिकनेत 48व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

त्यानंतर 55व्या मिनिटाला राहुल परदेशीने संघाची आघाडी वाढवली. पुढे 59व्या मिनिटाला कार्तिकने वैयक्तिक तिसरा गोल करताना संघाचा मोठा विजय साकारला.त्यापूर्वी झालेल्या सामन्यात जाएंटस संघाने पिछाडीवरून येत गनर्सचे आव्हान मोडून काढले. वेगवान सुरवात झालेल्या सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला अझिम मुल्लाने गनर्सला आघाडीवर नेले. सुरवातीलाच गोल केल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या गनर्स संघाने धडाधड आक्रमण करण्यास सुरवात केली.

सामन्याच्या दहाव्या मिनिटाला अझिमनेच त्यांना दुसरे यश मिळवून देताना आघाडी 2-0 अशी वाढवली. मध्यंतरापूर्वी 30व्या मिनिटाला अन्शुल शर्माने गोल करून गोलफरक 2-1 असा कमी केला. मध्यंतराला याच स्थितीत सामना थांबला होता.

उत्तरार्धाच्या प्रारंभीच तीन मिनिटात दोन गोल करून जाएंटसने आपली आघाडी भक्कम केली. सामन्यात 43 आणि 46व्या मिनिटाला हे गोल स्मितेश पवार याने केले.

उद्या होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत केपी इलेव्हन वि. स्निग्मय एफ.सी.ही लढत दु. 2 वाजता, तर दुसरी जाएंटस वि. जीओजी एफसीसी लढत दु. 3.45 मिनिटांनी होईल.

निकाल –

जाएंटस 3 (अन्शुल शर्मा 30वे, स्मितेश 43, 36वे मिनिट) वि.वि. गनर्स 2 (अझिम काझी 2रे आणि 10वे मिनिट)
जीओजी एफसीसी 4 (कार्तिक राजू 8वे, 48वे, 59वे , राहुल परदेशी 55वे मिनिट) वि.वि. डायनामाईटस 0

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button