TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विनावापरातील सायकल क्षेत्रीय कार्यालयात द्या, महापालिका ‘रिपेअर’ करुन गरजूंना देणार मोफत सायकल

पिंपरी चिंचवड | स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सायकल बँक उपक्रम हाती घेतला आहे. जुनी, विनावापार पडून असलेली सायकल महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भेट देण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले. महापालिका जुन्या, नादुरुस्त सायकल रिपअर करुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजु मुले, मुलींना मोफत भेट देणार आहे. महापालिका सायकली जमा करणा-या गृहनिर्माण सोसायट्या, नागरिकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करणार आहे.मुले, नागरिक सायकल घेतात. दोन -तीन वर्षे वापरतात. जुनी झाल्यावर वापराअभावी घरात, परिसरात, गच्चीवर, पार्कींमध्ये जिन्याच्या वळचणीला पडून राहतात. सायकली गंजतात. त्यामुळे सायकली भंगारवाल्याला दिल्या जातात. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सायकल बँक उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी गृहनिर्माण सोसायटी, घरामध्ये बेवारस पडलेल्या, जुनी, विनावापर पडून असलेली सायकल आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भेट द्यावी.

निगडी, प्राधिकरण भेळ चौक येथे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड स्टेशन जवळ ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, हॉकी स्टेडियम शेजारी नेहरुनगर भोसरी येथे ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, औंध-रावेत रोड, रहाटणी येथे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, पांजरपोळ संस्थेसमोर नाशिकरोड येथे ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत लोकमान्य टिळक चौक निगडी येथे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, करसंकलन कार्यालय व शेजारील माध्यमिक विद्यालय नवीन इमारत थेरगाव येथे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय आणि कासारवाडी येथील महिला आयटीआय इमारतीत ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय आहे. येथे नागरिक जुनी, वापराविना पडून असलेली सायकल भेट देऊ शकतात. महापालिका जुन्या, नादुरुस्त सायकल रिपअर करुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजु मुले, मुलींना मोफत भेट देणार आहे.

या गृहनिर्माण सोसायट्या, नागरिकांचा महापालिकेकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

”महापालिकेने सायकल बँक उपक्रम हाती घेतला आहे. जुन्या, वापराविना पडून असलेल्या सायकली भेट देण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाचे तीन आर म्हणजेच वस्तुंचा वापर कमी, पुर्नवापर, पुर्नचक्रीकरण या मार्गाचा अवलंब करु शकतो. महापालिका नादरुस्त सायकली रिपेअर करुन , गरजु मुले, मुलींना मोफत भेट देणार आहे. त्यामुळे नागरिकांना जुन्या सायकली भेट देऊन सहकार्य करावे. सायकली जमा करणा-या गृहनिर्माण सोसायट्या, नागरिकांचा महापालिकेकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे”, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button