breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगर भाजी मंडईतील गाळ्यांचे वाटप करताना स्थानिक भाजी विक्रेत्यांना प्राधान्य द्या!

  • भाजपा नगरसेविका नम्रता लोंढे यांची आग्रही मागणी
  • महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना लेखी निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी
इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठ येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भाजी मंडई उभारण्यात आली आहे. भूमी जिंदगी विभागाच्या वतीने या मंडईतील गाळ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, गाळे वाटप करताना येथील वर्षानुवर्ष भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक भाजी विक्रेत्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे या भाजीविक्रेत्यामध्ये कमालीचा रोष पसरला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्थानिक भाजी विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नगरसेविका नम्रता लोंढे यांनी केली आहे.

याबाबत नगरसेविका नम्रता लोंढे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील इंद्रायणी नगर से नं. २ मध्ये प्राधिकरण वतीने बांधलेली भाजी मंडई महापालिकेने ताब्यात घेऊन भूमी- जिंदगी विभागाच्या वतीने त्यांचे गाळे वाटप करण्यात आले. या यादीतील मोजके लोक स्थानिक असून बरेचसे बाहेर गावातील आहेत. यामध्ये आमच्या भागातील जुने भाजी विक्रेते यादीमध्ये आलेले नाहीत.

भाजी मंडई बांधण्याचा मुख्य उद्देश रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते आरक्षित भाजीमंडईच्या जागेत बसावेत. जेणेकरून रस्त्यावर गर्दी होणार नाही. वाहतुकीचा खोळंबा होणार नाही असा आहे. मात्र, वर्षानुवर्ष रस्त्यावर इतरत्र बसून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना डावलून इतरांना भाजी मंडई मधील गाळे वाटप झाले. मात्र यामुळे पदपथ व रस्ते मोकळे होणार नाही. या भाजी विक्रेत्यांना जर गाळे मिळाले नाही, तर ते पुन्हा रस्त्यावर बसतील व पुन्हा रस्ते गिळंकृत होतील. त्यामुळे या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असेही नगरसेविका लोंढे यांनी निवेदनात म्हटले आहे.

महिलांसाठी प्रशिक्षण तातडीने सुरू करा : लोंढे
महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या नागरवस्ती विभागाच्या महिलांसाठीच्या योजनेला या वर्षी खूप उशीर झाला असून, गरजू महिलांना या कोर्सेसची अत्यावश्यकता आहे व आपल्या या योजनेचा लाभ शहरातील खूप महिलाना होत असतो. या वर्षी या कोर्सेस उशीर झाला आहे. तातडीने हे कोर्सेस सुरु करावे अशी मागणी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button