पिंपरी / चिंचवड

मला खंडणी द्या, नाहीतर गुन्हा दाखल करेन: धमकी देत घेतली खंडणी

पिंपरी l प्रतिनिधी

खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिघांनी मिळून एका व्यक्तीकडून दोन हजार रुपये खंडणी उकळली. याप्रकरणी व्यक्तीच्या तक्रारीवरून तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चाकण येथील जनावरांच्या बाजार रोडला घडली.

निलेश भरत कुचेकर, राहुल शंकर पारवे, सुदर्शन उर्फ गुड्या सुनील आरकडे (सर्व रा. चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अतुल दिलीप राऊत (वय 36, रा. नेरळ, ता. कर्जत) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल राऊत हे चाकण येथील जनावरांच्या बाजारातून त्यांच्या टेम्पोमध्ये तीन वासरे भरून घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘आम्ही प्राण्यांचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही ही वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची केस तुमच्यावर करतो’, अशी आरोपींनी दमदाटी केली. तसेच केस न करण्यासाठी दोन हजार रुपयांचा हप्ता मागितला. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून दोन हजार रुपयांची खंडणी घेतली. याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button