ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारण

कोणता पक्ष, कोणत्या विचारांचा हा मतभेद न ठेवता तक्रारींचे लेखी स्वरुपात निवेदन द्या

पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार सनील शेळके यांचे मावळच्या जनतेला आवाहन

तळेगाव दाभाडेः राज्याचे पावसाळी अधिवेशन १० जून रोजी होणार होते, मात्र आता हे अधिवेशन २७ जूनपर्यंत पुढं ढकलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिवेशन दोन आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. हे अधिवेशन माझ्या पाच वर्षीय कारकिर्दीतील हे अखेरचे अधिवेशन असणार आहे, गेल्या चार-साडे चार वर्षांमध्ये अर्थसंकल्पीय, हिवाळी अधिवेश झालेत. त्या माध्यमातून जो काही निधी आणता येणे शक्य झाले तेवढा जास्तीत जास्त निधी मावळ तालुक्यासाठी आणला आहे. इथून पुढच्या अधिवेशनांमध्ये देखील तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी आणता येईल, तेव्हढा निधी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल. साडेपाच वर्षांच्या कालावधीतील हे शेवटचे अधिवेश आहे. त्या माध्यमातून मावळच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी आग्रही असेन. जेणेकरून जास्तीत जास्त कामे मार्गी लावता येतील, असे प्रतिपादन मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी व्यक्त केले. तळेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी त्यांनी मावळ तालुक्यातील जनतेला आवाहन केले की, ग्रामिण भागातील रस्ते, पाण्याच्या योजना, महत्त्वाकांक्षी प्रकल्कांकरिता जो काही निधी तालुक्यात आणता येईल त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. गाव, पाड्या-वाड्या वरील रस्त्यांच्या वस्त्या. तसेच शहरातील तळेगाव दाभाडे, देहूरोड, वडगांव मावळ तसेच लोळावळा या शहरातील रस्ते, लाईट पाणी या संदर्भात काही तक्रारी असतील, आपणास काही मागणी करावयाची असेल तर 20 जून पर्यंत लेखी स्वरुपामध्ये जर निवेदन केले तर त्यासाठी जेवढा जास्तीत जास्त निधी आणता येईल, जास्तीत जास्त कामे मार्गी लावता येतील.

गाव पाड्या-वाड्यावरच्या रस्त्यांची कामे, रस्ते सुधारण्यासाठी तसेच महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जो काही निधी आणता येईल, तेव्हढा आणण्यासाठी प्रयत्न करू. लाईट, पाणी या संबंधित काही मागण्या असतील तर त्या 20 जूनपर्यंत कराव्यात. जेव्हढ्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करता येतील तेव्हढ्या करण्यासाठी प्रामाणिकपणे तत्परता दाखवेन. ज्या ठिकाणी कामे प्रलंबित आहेत किंवा ज्या ठिकाणी अधिकची कामे करायची आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांनी मला रितसर निवेदन द्यावे, मागण्या कराव्यात, असे जाहीर करत मावळच्या जनतेला आमदार शेळके यांनी आवाहन केले.

कोणता पक्ष, कोणत्या विचारांचा हा मतभेद न ठेवता ज्या ज्या ठिकाणी आपणास माझी मदत हवी आहे, आपण आपल्या सूचना मला द्याव्यात, ज्या ज्या ठिकाणी निधीची गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेद्वारे मावळच्या जनतेला दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button