breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘देवेंद्र फडणवीस कधीही खोटं बोलत नाहीत’; गिरीश महाजन

पहाटेच्या शपथविधीचा मी पण साक्षीदार आहे

पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरून डिवचण्याचे काम सुरु होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत 2019ला झालेला शपथविधी हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारूनच झाला होता, असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या वादात आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उडी घेतली आहे. जी वस्तुस्थिती आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. ते कधीही खोटं बोलत नाहीत. असे भंपक विधाने देवेंद्र फडणवीस करत नाही. इतक्या वर्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी उद्धवजींची सेना काय म्हणते याला आम्ही अजिबात महत्त्व देत नाहीत, असं गिरीश महाजन म्हणाले.

अजितदादा तुम्ही बंडखोरांची चिंता करू नका. पहाटे पहाटे तुम्ही आमच्यासोबत शपथ घेतली आहे. त्यामुळे तो म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही सकाळी सकाळी आला होता, त्यावेळी मी तुमच्यासोबत होतो. पहाटेच्या शपथविधीचा मी पण साक्षीदार आहे, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांना लगावला.

निवडणुका या वर्षभर राहिलेल्या आहे. असं नसतं की, तुम्ही खाली उतरले, म्हणून निवडणुका घ्या. आम्ही जर असं म्हटलो असतो निवडणुका घ्या..तुम्ही घेतल्या असत्या का..त्यावेळी तुम्ही पळून गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. आता वर्षभरात घोडा मैदान समोर आहे, असं चॅलेंजच मंत्री महाजन यांनी उद्धव ठाकरे गटाला दिलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button