breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काळ्या बुरशीच्या रुग्णांवर मोफत उपचार करा! सोनिया गांधींचे मोदींना पत्र

नवी दिल्ली – देशात काळ्या बुरशीची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामुळे काही जणांचा मृत्यूही झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे एक विनंती केली आहे. म्युकरमायकोसिसवरील (काळी बुरशी) उपचारांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा पुरवठा केला जाईल याची काळजी घ्यावी आणि या विकाराने बाधित असलेल्या रुग्णांवर विनामूल्य उपचार करावेत, अशी मागणी सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

काळी बुरशी हा आजार आयुष्मान भारत आणि अन्य आरोग्य विमा योजनेअंतर्गत नाही, असे सोनिया गांधी यांनी निदर्शनास आणून दिले असून या प्रश्नावर तातडीने कृती करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. तर म्युकरमायकोसिसला साथरोग विकार कायद्यान्वये अधिसूचित करावे, अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना केली आहे. त्यामुळे त्यावरील उपचारांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांचे पुरेसे उत्पादन आणि पुरवठा झाला पाहिजे आणि त्यावरील उपचार विनामूल्य झाले पाहिजेत, असेही सोनिया यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी लिपोसोमल अ‍ॅम्फोटेरिसीन-बी हे औषध अत्यावश्यक असल्याचे आपल्याला सांगण्यात आले आहे. मात्र बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याचे समजले, असे सोनिया यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, यापूर्वी गुरुवारी सोनिया यांनी मोदी यांना एक पत्र लिहिले होते त्यामध्ये करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती.

Sharing is caring!

Facebook
Pinterest
Twitter
Google+
Related Posts:
विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादीचे ‘हे’ दोन शिलेदार रिंगणात
भाजपचं ‘काळे झेंडे’ आंदोलन हा कोरोना योद्धाचा अपमान – अजित पवार
मित्र कोण आणि शत्रू कोण महाराष्ट्राला चांगलंच ठाऊक – देवेंद्र फडणवीस
‘जेएनयू’मधील घटना लपून राहावी यासाठीच भाजपाचे ‘तांडव’ – जयश्री खाडिलकर-पांडे
Tags: bjp,CONGRESS,Mucormycosis,narendra modi,sonia gandhi

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button