पिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या राष्ट्रीय स्पर्धेत गौतमी निकम देशात पहिली

– नाना काटे सोशल फाउंडेशन, सागर कोकणे मित्र परिवाराकडून गौतमीचा सत्कार

पिंपरी l प्रतिनिधी

राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा यांच्या वतीने सन 2019 सत्रामध्ये राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. या परीक्षेमध्ये गौतमी संजय निकम ही विद्यार्थिनी भारतामध्ये सर्वप्रथम आली आहे. त्याबद्दल गौतमी निकम हिचा नाना काटे सोशल फाऊंडेशन आणि सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सन 1936 साली राष्ट्रभाषा प्रचार समितीची वर्धा येथे स्थापन केली आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. या समितीच्या वतीने दरवर्षी राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा घेतली जाते.

सन 2019 सत्रामध्ये राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. या परीक्षेमध्ये गौतमी संजय निकम ही विद्यार्थिनी भारतामध्ये सर्वप्रथम आली आहे. त्याबद्दल गौतमी निकम हिचा नाना काटे सोशल फाऊंडेशन आणि सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गौतमी हिला पुढील शिक्षणासाठी नाना काटे सोशल फाऊंडेशन, स्विकृत सदस्य सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. तिला पुढील शिक्षणासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button