ताज्या घडामोडीराष्ट्रिय

मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानींची सरशी, केला ‘हा’ विक्रम

 नवी दिल्ली | अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ‘ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्स’नुसार, त्यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलरवर गेली आहे. चालू वर्षीच त्यांनी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरण्याचा मान पटकावला आहे. आतापर्यंत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे सर्वेसर्वा आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते. अंबानी यांची एकूण संपत्ती ९९ अब्ज डॉलर आहे.

आशिया खंडातील अव्वल धनिक ठरल्यानंतर अदानी जगातील दहाव्या क्रमांकाचेही श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. या यादीत ‘टेस्ला’चे संस्थापक एलन मस्क अव्वल स्थानी असून, अंबानी आता अकराव्या स्थानी आहेत. अदानी यांचा समावेश आता ‘सेंटीबिलिनेयर्स क्लब’मध्ये झाला आहे. शंभर अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती कमविणाऱ्यांना ‘सेंटीबिलिनेयर्स’ म्हटले जाते.

आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या अंबानी आणि अदानी यांना आर्थिक वर्ष २०२१-२२ चांगलेच फलदायी ठरले. या वर्षात अदानी यांच्या संपत्तीमध्ये ६९.७० टक्क्यांची आणि अंबानी यांच्या संपत्तीमध्ये २०.६७ टक्क्यांची भर पडली. सरत्या आर्थिक वर्षात अदानी यांनी दररोज ७५६ कोटी रुपयांची आणि अंबानी यांनी ३७८ कोटी रुपयांची कमाई केली.

अदानींविषयी…

– १९८०मध्ये मुंबईत हिरे व्यापारी म्हणून सुरुवात. विसाव्या वर्षी लखपती.

– १९९७मध्ये अंडरवर्ल्ड डॉन फजलू अहमद याने अदानींचे अपहरण केले होते.

– हॉटेल ताजवर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी अदानी तेथे अडकले होते.

– अदानींनी शालेय शिक्षण अर्ध्यातच सोडले होते. अहमदाबादमधील ‘सीएन’ स्कूलमध्ये शिकत होते.

– अदानी पॉवर ही देशातील सर्वांत मोठी सौर ऊर्जा उत्पादक कंपनी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button