ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काळेवाडी वाकड परिसरात ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा संपन्न

– टाटा मोटर्स मित्र परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी ,प्रतिनिधी :
वाकड येथील अंबियन्स हॉटेल या ठिकाणी नुकताच ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा विविध उपक्रमाने आनंदात साजरा करण्यात आला टाटा मोटर्स कंपनीतील निवृत्त अधिकारी व कर्मचारी मित्रपरिवार यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग प्रभागाचे माजी अध्यक्ष व नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन नगरसेवक चंद्रकांत नखाते टाटा मोटर्सचे माजी अधिकारी जयराम भोसले श्री राजेंद्र नरेंद्रकुमार झुलका युनियन प्रतिनिधी राजेंद्र कोलते प्रदीप लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या संयोजनासाठी इंद्रजीत पवार अशोक पाटील वसंतराव बोडके गजानन साळुंखे मकरंद बडवे आदींनी पुढाकार घेतला याप्रसंगी अशोक देशमुख यांचे व्याख्यान झाले अशोक देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून ज्येष्ठांनी कशाप्रकारे आनंदी जीवन जगावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच योगाचे महत्व व निरोगी जीवनाचे रहस्य नमूद केले . जेष्ठ नागरिकांनी ऑनलाईन फसणूक टाळण्यासाठी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुपारच्या सत्रात ज्येष्ठांनी संगीत गाण्यांचा आनंद घेतला इंद्रजीत पवार यांनी प्रास्ताविक केले तर वसंतराव बोडके यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button