breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेत गणेश पांडियनचे घवघवीत यश

पिंपरी – ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील ‘ॲथलिट’ गणेश पांडियन याने सुवर्णपदकांची कमाई करत घवघवीत यश मिळवले.ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२१ चे आयोजन करनाल, हरियाणा येथील करण स्टेडियम येथे करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी खेळाडू ‘ॲथलिट’ गणेश पांडियन हा सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याने उत्तुंग यशाला गवसणी घालत ११० मीटर हर्डल्स व ४०० मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक मिळवले. तसेच ४×४०० मीटर रिले या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या यशाने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.

सदर स्पर्धेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता. गणेश पांडियन याच्या या यशाचे कौतुक पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनी करून योग्य तो सन्मान केला. याप्रसंगी क्रीडा अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक रज्जाक पानसरे, अनिता केदारी, विश्वास गेंगजे तसेच क्रीडा मार्गदर्शक शेखर कुदळे, रुस्तम पठाण व हॉकी महाराष्ट्र संघटनेचे जनरल सेक्रेटरी मनोज मोरे उपस्थित होते.

याप्रसंगी क्रीडा मार्गदर्शक शेखर कुदळे व रुस्तम पठाण यांचाही सन्मान करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button