TOP Newsताज्या घडामोडीपुणे

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात जी.ए. सॉफ्टवेअरच्या संस्थापकाचा सहभाग

पुणे | आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहार प्ररकरणी जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटीमध्ये आता जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र तो अद्याप हजर झालेला नाही.

सौरभ त्रिपाठी, निखिल कदम आणि अश्विनकुमार शिवकुमार या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी न्यायालयात आणले होते. यावेळी या गुन्ह्यात जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे बंगळुरूचा संस्थापक गणेशन याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सल्लागार अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतीश देशमुख आणि सौरभ त्रिपाठी यांच्यात टीईटी परीक्षेमध्ये अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्याबाबत डिसेंबर २०१७ मध्ये दिल्लीत बैठक झाली होती. तर राज्य परीक्षा परीषदेने टीईटी २०१८ परीक्षेतील ८१ बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. ती कोणी तयार केली, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, सुखदेव ढेरे यांच्या घराच्या झडतीमध्ये २ लाख ९० हजार ३८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निखिल कदम यांच्याकडील मोबाईलमधून अश्विनकुमार याला पाठविलेले ई मेल प्राप्त झाले आहेत. निखिलने अश्विनकुमार याला ५६ परीक्षार्थींची यादी दिली होती. तुकाराम सुपे यांच्या कार्यालयातील संगणकावरच टीईटी २०२० मधील ८०० अपात्र परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेत मार्क वाढवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button