breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी येथील प्रस्तावित न्यायालयासाठी १६ कोटी रुपयांचा निधी

  • महापालिका सर्वसाधारण सभेत उपसूचनेला मंजुरी
  • पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना होणार फायदा

पिंपरी । प्रतिनिधी
मोशी येथील प्रस्तावित न्यायालयाच्या इमारत उभारणीसाठी महापालिका सर्वसाधारण सभेत १६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे न्यायालय उभारणीच्या कामाला गती मिळणार असून, शहरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित होता. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने इमारतीसाठी जागा आणि निधीची तरतूद करण्याचे आश्वासन पिंपरी-चिंचवडकरांना देण्यात आले होते. सर्वसाधारण सभेने आता निधीला मंजुरी दिल्यामुळे शहरातील विधितज्ज्ञ आणि नागरिकांडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

मोशी येथील नियोजित न्यायालयीन संकुलाच्या बांधकामासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच, संपूर्ण न्यायालयाच्या बांधकामाचा खर्च पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याच्या उपसूचनेला मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे तसेच माजी अध्यक्ष सुभाष चिंचवडे, माजी अध्यक्ष संजय दातीर पाटील,माजी अध्यक्ष दिनकर बारणे,पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अतीश लांडगे, विद्यमान कार्यकारिणीचे उपाध्यक्ष ॲड. गौरव वांळुज, सचिव ॲड. निखिल बोडके, महिला सचिव ॲड. प्रियांका सुरवसे, सहसचिव ॲड. सुनील रानवडे, खजिनदार ॲड. अनील पवार, हिशेब तपासनीस ॲड. गोरख मकासरे आणि सदस्य ॲड. संतोषी काळभोर, ॲड. स्नेहा कांबळे, ॲड.मंगेश खराबे, ॲड.महेश मासुळकर, ॲड.सारिका मोरे, ॲड.ऐश्वर्या सिरसाठ यांनी पाठपुरावा केला आहे.

मावळ, खेड नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अतीश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पुणे आणि मुंबईतील न्यायालयांमध्ये जावे लागते. सुमारे ३५ हजार खटले आजही प्रलंबित आहेत. याबाबत महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती सभापती यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच, सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. त्यामुळे शहरातील नागरिकांना शहरातच न्यायालय उपलब्ध होणार असून, होणारी पायपीट आणि आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.

बार असोसिएशनकडून लोकप्रतिनिधींचे आभार…
न्यायालयाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अण्णा बनसोडे, महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते तसेच सर्व पक्ष नगरसेवक यांचे संपूर्ण पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनकडून आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button