breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

इंधन दरवाढ सुरूच ;मुंबईत पेट्रोल ११५ रुपयांवर तर डिझेल १०६ रुपयांवर

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सामान्यांना इंधन दरवाढीच्या झळा बसत आहेत. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्यात आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली. यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलच्या दराने ११५, तर डिझेलच्या दराने १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने आज जाहीर केलेल्या सुधारित इंधन दरानुसार पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल १०९ रुपये ३४ पैसे आणि डिझेल ९८ रुपये ७ पैसे लिटर झाले आहे. या सततच्या इंधन दरवाढीमुळे देशातील बहुतेक राज्यांमधील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, केरळ, गोवा आणि लडाख येथे डिझेलनेही दराची शंभरी ओलंडली आहे. चेन्नईत पेट्रोल १०६ रुपये ४ पैसे आणि डिझेल १०२ रुपये २५ पैसे, कोलकात्यात पेट्रोल १०९ रुपये ७९ पैसे आणि डिझेल १०१ रुपये १९ पैसे, तर बंगळुरूत पेट्रोल ११३ रुपये १५ पैसे आणि डिझेल १०४ रुपये ९ पैसे लिटर झाले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button