ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुंठेवारी नियमितीकरणासाठी ‘एफएसआय’ निश्चित

पिंपरी चिंचवड | पिंपरी – चिंचवड शहरात डिसेंबर 2020 पूर्वी झालेली गुंठवारीतील बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) आणि सामासिक अंतरे निश्चित केली आहेत. संबंधित नागरिकांकडून महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण व परवानगी विभागाने अर्ज मागविले आहेत.महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार शहरात 31 डिसेंबर 2020 पूर्वी झालेली, गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. नियमितकरणासाठी बांधकाम कुठे व कोणत्या रस्त्यालगत आहे, त्यानुसार अ, ब, क, ड, इ व फ असे सहा झोन केले आहेत. त्यानुसार एफएसआय निश्चित केला आहे.

निवासी आणि वाणिज्य क्षेत्रातील व एफएसआयच्या मर्यादेत राहून केलेली व निर्देशांकापेक्षा अधिकचे बांधकाम स्वत: हटवले असल्यास उर्वरित बांधकामे नियमित केली जाणार आहेत. मात्र, नदी पात्रातील, निळ्या पूररेषेतील, आरक्षणे, रस्त्यांना बाधित, रेडझोन, बफर झोन, धोकादायक, सरकारी जागेवरील, शेती झोन, ना विकास झोन आणि नाला क्षेत्रातील बांधकामे नियमित केली जाणार नाहीत, असे बांधकाम परवाना विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

निवासी आणि वाणिज्य अशा मिश्र वापरासाठीचा (क झोन) एफएसआय वाणिज्य क्षेत्राच्या वापराच्या पटीत निश्चित केला आहे. निवासी व मिश्र वापराच्या इमारतींचा एफएसआय (ड झोन) रस्त्याची रुंदी व इमारतींच्या उंचीनुसार वेगवेगळा आहे. तसेच, भूखंडाच्या क्षेत्रानुसार निवासी व मिश्र वापराच्या इमारतींचा एफएसआय (इ झोन) त्यांच्या उंचीनुसार आणि सामासिक अंतराचा एफएसआय (फ झोन) बांधकामाचा प्रकार, इमारतींची उंची आणि रस्त्याची रुंदी यानुसार वेगवेगळा आहे. तो एक मीटरपासून ते साडेतीन मीटरपर्यंत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button