breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात फळ-भाज्यांचे दर कडाडले; टोमॅटो, बटाटा, फ्लॉवर, शेवगा महाग

पुणे |

गुढी पाडव्याचा सण काल झाल्याने मार्केट यार्डात शेतमालाची आवक कमी झाली आहे. आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने टोमॅटो, बटाटा, फ्लॉवर, शेवगा, घेवड्याचे दर थोडेसे वाढले आहेत, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. मार्केट यार्डात करोनाच्या संसर्गानंतर आता बाजारात आवक वाढल्याने उलाढालही वाढली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारात वाढ होतान दिसत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवारी ७० ते ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे.

कर्नाटक, गुजरातमधून सात ते आठ टेम्पो हिरव्या मिरचीची, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून शेवग्याची तीन ते चार टेम्पो, राजस्थानातून गाजराची चार ट्रक आवक झाली आहे. कर्नाटकातून दोन टेम्पो घेवड्याची आवक झाली आहे. हिमाचल प्रदेशातून एक टेम्पो मटारची आवक झाली आहे. कर्नाटकातून चार ते पाच टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली आहे.

स्थानिक भागातून सातारी आल्याची सातशे ते आठशे पोत्यांची आवक झाली आहे. भेंडी, कोबीची प्रत्येकी चार ते पाच टेम्पो, गवारची दोन ते तीन टेम्पोंची आवक झाली आहे. टोमॅटोची सात ते आठ हजार कॅरेट्सची आवक झाली आहे. सिमला मिरचीची सात ते आठ टेम्पो, स्थानिक भागातून मटारची अडीचशे गोणींची आवक झाली आहे. तांबडा भोपळ्याची आठ ते दहा टेम्पोंची आवक झाली आहे. पुणे विभागातून कांद्याची ५० ते ६० ट्रक; तसेच बटाट्याची २५ ते ३० ट्रक आवक झाली आहे. लसणाची मध्य प्रदेश, गुजरातमधून आठ ते दहा ट्रक एवढी आवक झाली आहे.

  • लिंबे, डाळिंब, खरबूज महाग

मुस्लिम बांधवांचा रमजानचा महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उपवास सोडण्यासाठी विविध प्रकारच्या फळांना मागणी असते. त्यामुळे या रविवारपासून फळांना मागणी वाढली आहे. मार्केट यार्डात रविवारी लिंबू, डाळिंब, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात वाढ झाली आहे. अननस, पेरू, संत्रा आणि मोसंबीचे दर स्थिर आहेत.

कलिंगड ४० ते ५० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो, अननसाची पाच ट्रक, मोसंबी २५ ते ३० टनाची आवक झाली आहे; तसेच संत्री १५ ते २० टन, डाळिंब २५ ते ३० टन, लिंबांची एक हजार ते १३०० गोणीची आवक झाली आहे. पेरूची ३०० ते ४०० क्रेट, चिकू दोन हजार बॉक्स इतकी आवक झाली आहे. लिंबाच्या दरात गोणीमागे ४०० ते ५०० रुपये, डाळिंबाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात प्रतिकिलोस दोन रुपये आणि चिकूच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • मासळीत घट, चिकन, मटण स्थिर

गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत बहुतांश नागरिकांनी सामिष पदार्थ खाणे टाळले असल्याने मासळीच्या मागणीत घट झाली आहे. डिझेल दरवाढीमुळे बाजारातील आवकही घटली आहे. त्या तुलनेत मागणी घटल्याने दर पाच टक्क्यांनी उतरले आहेत. बोटीसाठी लागणाऱ्या डिझेलचे दर वाढल्याने समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी परतल्या आहेत. अपेक्षित मासेमारी न झाल्याने गणेश पेठेतील मासळी बाजारातील मासळीची आवक निम्म्यावर आली आहे.

उन्हाचा वाढलेला कडाका; तसेच चढ्या दरामुळे पुणेकरांनी चिकनकडे पाठ फिरविल्याने मागणी घटली आहे. प्रतिकिलोमागे २० रुपयांची घसरण झाली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कायम असल्याने मटण, गावरान व इंग्लिश अंड्याचे गत आठवड्यातील दर टिकून आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची पाच ते आठ टन, खाडी २०० ते ३०० किलो, तर नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ ते १६ टन इतकी आवक झाली. उल्कापात, उपग्रहाचे तुकडे की इलेक्ट्रॉन बुस्टर खगोल अभ्यासकांनी केलं स्पष्ट

कोथिंबीर महागली

मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर आाणि राजगिऱ्याच्या दरात वाढ झाली असून, अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची आवक एक लाख ४० हजार जुडी, मेथीची ५० हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीच्या घाऊक बाजारात जुडीमागे तीन रुपये आणि राजगिऱ्याच्या गड्डीमागे एक रुपयांनी वाढ झाली आहे.

फुलांचे दर स्थिर

दोन दिवसांपासून फुलांचे वाढलेले दर टिकून आहेत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माल काढला होते. त्यामुळे रविवारी फुलांची आवक कमी झाली आहे. मागणी कमी असल्याने दर स्थिर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button