TOP Newsताज्या घडामोडीपुणे

रक्तदान शिबिरातून महापौरांनी पुणेचं नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राला आदर्श घातला – लहू बालवडकर

पुणे | कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी आणि शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे पुणे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून केवळ ५-६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या वाढदिवस (मंगळवार, ९ नोव्हेंबर) रक्तदान महासंकल्प दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.पुणे शहराला दररोज ६०० रक्तपिशव्यांची आवश्यकता असून प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात रक्तसंकलन होत नसल्याचे रक्तपेढ्यांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची आवश्यकता आहे. या अनुषंगाने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने ‘रक्तदान महासंकल्प दिवस’अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप सदस्य लहू बालवडकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी लहू बालवडकर म्हणाले, पुण्यात रक्ताचा भयंकर तुटवडा जाणवत आहे. ही बाब गंभीर आहे, हे लक्षात घेऊन पुण्यनगरीचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यांतून त्यांनी खऱ्या अर्थाने पुणे शहर नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राला आदर्श घालून दिला, असे प्रतिपादन बालवडकर यांनी केले. महापौर मोहोळ यांना रक्तदान शिबिरानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या तसेच बालवडकर आणि आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवला असल्याचेही त्यांनी सांगितले.महापौर मोहोळ म्हणाले, ‘आपण नेहमीच म्हणतो रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आज संपूर्ण शहरात रक्ताचा मोठा तुटवडा असताना असताना हे श्रेष्ठदान करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध केली आहे. यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ, हार-तुरे, केक, भेटवस्तू किंवा होर्डिंगच्या माध्यमातून देण्याऐवजी रक्तदान करुन द्याव्यात. पुणेकरांनी संपूर्ण कोरोना संसर्ग काळात सामूहिकपणे सामाजिक बांधिलकी जपत कोरोना संकटाचा सामना केला. आता शहराला रक्ताची गरज निर्माण झाली असताना पुणेकर रक्तदान महासंकल्प दिवसाच्यानिमित्ताने एकवटून मोठ्या प्रमाणावर रक्तदान करतील हा विश्वास आहे’.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button