breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीव्यापार

एलपीजीपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत, देशात झाले हे बदल, काय परिणाम होईल तुमच्या खिशावर?

Big Change from 1 June 2024 : जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक बदल होत आहे. 1 जूनपासून तुमच्या खिसावर या बदलाचा थेट परिणाम दिसून येईल. एलपीजी सिलेंडर, क्रेडिट कार्डचे नियम, वाहन परवाना तसेच इतर अनेक बदल झाले आहेत. या बदलाचा सर्वसामान्य नागरिकावर परिणाम होईल. त्यांना या बदलाचा फायदा होणार आहे.

तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. 1 जून 2024 रोजी त्यात बदल दिसून आला. नवीन दर कंपन्यांनी जाहीर केले आहे. IOCL च्या संकेतस्थळानुसार, सातत्याने तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत कपात करण्यात आली. 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 72 रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. यावेळी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसून आला नाही.

आज सकाळीच ऑईल कंपन्यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालापूर्वी ही आनंदवार्ता दिली. ताज्या बदलामुळे 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1 जून रोजी दिल्लीत 69.50 रुपयांनी, कोलकत्तामध्ये 72 रुपयांनी, मुंबईत 69.50 रुपये तर चेन्नईत 70.50 रुपयांनी स्वस्त झाला.

हेही वाचा    –    जून महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँकांना सुट्टी; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

जून महिन्याच्या सुरुवातीलाच हवाई प्रवासाबाबत आनंदवार्ता येऊन धडकली. निवडणुकीच्या निकालानंतर हवाई प्रवास स्वस्त होईल. देशातील चारही महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधन प्रति किलोलिटर 51.1 डॉलरने स्वस्त झाले आहे. 1 जून रोजी ऑईल कंपन्यांनी जेट फ्यूल म्हणजेच एअर टर्बाइन फ्यूल (एटीएफ) च्या किंमतीत मोठी कपात केल्याने विमान भाडे कमी झाले आहे. देशातंर्गत प्रवास यामुळे स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय मार्गांसाठीही जेट इंधनाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशातील चारही महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधन प्रति किलोलिटर 51.1 डॉलरने कमी झाले आहे.

1 जूनपासून तिसरा मोठा बदल झाला. क्रेडिट कार्डच्या नियमात बदल झाला. कार्डच्या वापरकर्त्यांसाठी हा बदल झाला. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, एसबीआयने, क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केला आहे. एसबीआयच्या काही क्रेडिट कार्डवर व्यवहार केल्यानंतर रिवॉर्ड मिळणार नाही. पॉईंट मिळणार नाही. यामध्ये ऑरम, एलिट, अँडव्हांटेज, कार्ड प्लस, सिम्पलीक्लिक आणि इतर कार्डवर आता रिवॉर्ड मिळणार नाहीत.

जून महिन्याच्या एक तारखेपासून वाहन परवानासंबंधी मोठा बदल झाला आहे. आजपासून खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट होऊ शकेल. RTO मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ही चाचणी होईल.

जून महिन्यातील 14 तारखेपासून हा बदल लागू होईल. UIDAI ने आधार कार्डच्या मोफत सुविधेची मर्यादा वाढवली आहे. आता 14 जूनपर्यंत नागरिकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये बदल करता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button