breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

प्राधिकऱण से. १२ गृहप्रकल्पामुळे ५० हजार नागरिक वाढणार, प्रथम पाणी टाकी बांधा- जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे

पिंपरी |

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पेठ क्र. १२ चे मध्ये सुमारे साडेअकरा घरांची वसाहत साकऱते असल्याने किमान ५० हजार लोकसंख्या वाढणार आहे. या प्रस्तावित गृह योजनेच्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्याची नितांत गरज असल्याने त्याबाबत त्वरीत निर्णय घेण्याची मागणी जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे. प्राधिकऱणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्याबाबत नुकतेच एक लेखी निवेदन दिले आहे. महापालिका आयुक्त आणि पाणी पुरवठा विभाग प्रमुखांनाही निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.

जेष्ठ नगरसेविक सीमा सावळे आपल्या निवेदनात म्हणतात, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पेठ क्र. १२ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे ११,५०० सदनिकांची गृह प्रकल्प योजना राबविली जात आहे. सदर योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील ४,८८३ सदनिकांचे वाटपाची सोडत देखील काढण्यात आली आहे. तसेच मार्च २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यातील सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे, असे समजते. प्रस्तुत गृह प्रकल्पातील प्रस्तावित सदनिकांचा विचार करता सदर से. १२ या एकाच ठिकाणी सुमारे ५०,००० लोकसंख्या वाढणार आहे (जनगणने च्या निकषानुसार एका कुटुंबाची संख्या अंदाजे ४.५ X ११,५०० सदनिका). तसेच प्रस्तुत गृह प्रकल्पाचे व्यतिरिक्त से. १२ चे क्षेत्रात वाणिज्य वापराचे भूखंड, प्राथमिक, माध्यमिक शाळा, भाजी मंडई, दवाखाना अशी विविध प्रयोजने प्रस्तावित आहेत. सबब से. १२ च्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असणार आहे.

इंद्रायणीनगर, स्पाईन रोड या सेक्टर १ ते १३ चे परिसराची लोकसंख्या सुमारे ५० ते ६० हजार इतकी आहे. सेक्टर १२ च्या प्रस्तावित विकसनामुळे सदर परिसरातील पाण्याची मागणी दुप्पटपेक्षा जास्त होणार आहे. अशा स्थितीत से. १२ चे ठिकाणी नव्याने होणाऱ्या नागरीकरणाचा विचार करता से. १ ते १३ मध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या टाक्या अत्यंत अपुर्या पडणार आहेत. सध्यस्थितीत से. १ ते १३ चे परिसरात उपलब्ध पाणी पुरवठा मर्यादित आहे. तसेच से. ५, ८ मध्ये अंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे बांधकाम देखील प्रगतीपथावर आहे. “भामा आसखेड धरणातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पाणी पुरवठा झाल्यावर से. १२ चे प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जाईल या अटीवर सदर प्रकल्पाला मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पाण्याची टाकी बांधण्यासाठी साधारणत: २ वर्षांचा कालावधी लागतो. या सर्व बाबींचा विचार करता से. १२ चे ठिकाणी नव्याने पाण्याच्या टाक्या तातडीने बांधणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा से. १ ते १३ चे ठिकाणी पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडेल व त्याठिकाणी रहात असलेल्या नागरिकांचे अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे अतोनात हाल होती. वस्तुत: से. १२ चे प्रस्तावित विकसनाचे नियोजन करतानाच या सर्व बाबींचा विचार करून त्याचे आगाऊ नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र तसे करण्यात आलेले नाही, असे सीमा सावळे यांनी निदर्शनास आणून दिले.

सर्व मुद्यांचा गांभीर्याने विचार करून सेक्टर १ ते १३ चे ठिकाणी सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन तातडीने करावे, अशी कळकळीची विनंती सीमा सावळे यांनी निवेदनात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button