ताज्या घडामोडीमुंबई

घराच्या बाल्कनीवरुन दोन कुटुंबियात वाद; दोन महिलांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी

कल्याण |  घराच्या बाल्कनीमुळं दोन कुटुंबात फ्री-स्टाइल हाणामारी झाल्याची घटना कल्याण पश्चिमेतील बारावे येथे घडली आहे. दोन कुटुंबीयात वाद झाल्याचे व्हिडीओ आणि सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. संबंधित तक्रारदाराने हा व्हिडिओ सुध्दा पोलिसांना दिला आहे. त्यामुळे नेमका वाद कशामुळे झाला. मारहाण केलेल्या महिला कोण होत्या. या सगळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

हा वाद शेजाऱ्याच्या घराच्या बाल्कनीवरून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. व्हिडीओत सुरूवातीला एका घराच्या दरवाज्याजवळ दोन महिलांनी एका महिलेवरती हल्ला केल्याचे दिसत आहे. त्यावेळी त्या घरातून एक लाल रंगाचा शर्ट घातलेला पुरूष देखील बाहेर आलेला दिसला. तर, एका महिलेला त्या महिला मारहाण करत रस्त्यावर खेचत आहेत. तसेच त्यावेळी अनेक महिला जमा होताना व्हिडीओत दिसत आहेत. महिला एकामेकींच्या केसाला पकडून मारहाण करीत आहेत.

दोन महिलांनी एका महिलेला चक्क बॅटने मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मारू दे…मारू दे…मी त्यांची आता बरोबर वाट लावतो, असं एक पुरूष व्हिडीओत बोलत असल्याचेही दिसतेय. याबाबत खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. संबंधित तक्रारदाराने हा व्हिडीओ सुध्दा पोलिसांच्या दिला आहे. त्यामुळे नेमका वाद कशामुळे झाला. मारहाण केलेल्या महिला कोण होत्या. या सगळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button