breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोफत लॅपटॉप, मोफत वीज, मोफत पेट्रोल,सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण; सपाच्या जाहीरनाम्यात मोठमोठ्या घोषणा

लखनौ | टीम ऑनलाइन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ साठी समाजवादी पक्षाने मंगळवारी आपला जाहीरनामा जाहीर केला. समाजवादी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. सर्व पिकांसाठी एमएसपी देण्यात येईल आणि १५ दिवसांच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज आणि बिनव्याजी कर्जाची व्यवस्था केली जाईल. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दुचाकी वाहनांसाठी १ लिटर, ऑटो चालकांसाठी ३ लिटर पेट्रोल दर महिन्याला मोफत दिले जाणार आहे. ऑटो चालकांना दरमहा ६ किलो मोफत सीएनजी देण्यात येणार आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण, बीपीएल कुटुंबांना 2 सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. १०९० पुन्हा मजबूत करेल, ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे एफआयआरची व्यवस्था होईल. मुलींचे केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत असेल, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

सर्व गावांमध्ये वाय-फाय झोन तयार केले जातील. घरपट्टी आणि मालमत्ता करातील त्रुटी दूर करणार. ३०० युनिट घरगुती वीज मोफत, ग्रामीण रस्ते आरसीसी होणार. जिल्हानिहाय प्रदूषणाची विल्हेवाट लावणार.जुनी पेन्शन पद्धत लागू करणार, असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button