breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

रोटरीच्या पुढाकाराने ६०० कामगारांचे मोफत कोविड लसीकरण

पिंपरी |

रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने आणि रोटरी सदस्य अनिल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने चाकण येथील पुजा कास्टिंग कंपनीमधील कामगारांसाठी मोफत कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ६०० कामगारांना लस देण्यात आली. शिबिराच्या उदघाटनप्रसंगी रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष जगमोहन भुर्जी, हरदीप कौर भुर्जी, केशव मानगे, अशोक लुल्ला, राकेश सिंघानिया, जयंत येवले, सोनाली येवले, संदीप मुनोत, सचिव सुहास ढमाले, प्रणीता अलूरकर, पूजा कास्टिंगचे व्यवस्थापकिय संचालक अनिल कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, नम्रता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

तसेच टाटा मोटर्सचे विद्युल चटणे, सरोज पाडी, मिलिंद पोद्दार, मिलिंद उपासनी, सुशील देशमुखे, हनिश मोंगा, सुब्रोतो चॅटर्जी, रवी कंडी हे ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी टाटा मोटर्सचे परचेस विभागाचे सरव्यवस्थापक श्री.जयकुमार चुत्तर यांनी ऑनलाईन शुभेच्छा व्यक्त करीत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले कि, औद्योगिक क्षेत्र निरोगी ठेवायचे असेल तर कामगार केंद्रबिंदू माणून लहान मोठ्या कंपन्यानी लसीकरण शिबीरे राबवले पाहिजेत. आयोजक संकेत कुलकर्णी म्हणाले कि, कोरोना एक जागतिक संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी आम्ही थोडासा प्रयत्न करीत आहोत. एक सामाजिक जबाबदारी म्हणून रोटरीच्या सहकार्याने आम्ही हे लसीकरण शिबीर घेतले आहे.देशाची आर्थिक घडी सुधारण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुदृढ हवे. हा कित्त्ता इतर कंपन्यांनी गिरवला पाहिजेत. प्रास्ताविक व सूत्रसंचालन नम्रता यांनी तर आभार अनिल कुलकर्णी यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button