पिंपरी l प्रतिनिधी
झूम कार या अॅप्लीकेशनवरून कार बुक करून ती नेली आणि दिलेल्या मुदतीत ती परत आणून दिली नाही. याप्रकरणी एकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मार्च रात्री साडेसात ते 11 एप्रिल 2022 रात्री दहा वाजताच्या कालावधीत 16 नंबर बस स्टॉपथेरगाव येथे घडली.
गणेश प्रकाश बारणे (वय 40, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश दगडू कांबळे (रा. पवारवस्ती, दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल आकरण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑनलाईन माध्यमातून फिर्यादी यांची कार झूम कार या अॅप्लीकेशनवरून बुक केली. ती कार आरोपीने 27 मार्च पहाटे साडेचार वाजेपर्यंत बुक केली होती. कार बुक केल्यानंतर आरोपीने कार 26 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता नेली. ती दिलेल्या मुदतीत परत आणून न देता आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.