पिंपरी / चिंचवड

टाटा मोटर्स कंपनीच्या नावाने बनावट जॉईनिंग लेटर बनवून एकाची चार लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

नोकरी लावण्याच्या बहाण्याने व्यक्तीला दापोडी येथील सीएमई गेट आणि टाटा मोटर्स कंपनी पिंपरी येथे बोलावून त्याच्याकडून सुमारे चार लाख रुपये घेतले. त्यांनतर टाटा मोटर्स कंपनीच्या नावाने बनवत जोईनिंग लेटर बनवून फसवणूक केली. हा प्रकार 17 डिसेंबर 2021 ते 29 मार्च 2022 या कालावधीत घडला.

फारुख अहमदअली लासकर (वय 40, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विजय काशिनाथ तांबे (वय 38, रा. वाघोली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्या निमित्ताने फिर्यादी यांना दापोडी येथील मिलिटरी इंजिनिअरींग कॉलेज गेट आणि पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीत बोलावून घेतले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून नोकरी लावण्यासाठी आरोपीने रोख आणि ऑनलाईन स्वरुपात एकूण तीन लाख 95 हजार रुपये घेतले. फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीचे सुनील लक्ष्मण बगाडे यांच्या मुलींना कामाला लावतो म्हणून आरोपीने टाटा मोटर्स कंपनीच्या नावाने बनावट जॉईनिंग लेटर तयार केले. ते फिर्यादी यांना व्हाटसअपवर पाठवून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button