पिंपरी / चिंचवड

तांदूळ, बटाटा विक्रीचे आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक

पिंपरी | प्रतिनिधी

तांदूळ आणि बटाटा हे कमी किमतीत खरेदी करून त्याची शहरात विक्री करण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याची 24 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2019 ते 4 मे 2022 या कालावधीमध्ये काळेवाडी येथे घडली.

अहमद साबिरअली शेख आणि त्याचा भाऊ सरफराज शेख (दोघेही रा. पश्‍चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. सुमित अनिल विश्वास (वय 36, रा. पंचनाथ चौकाजवळ, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी भाऊ हे फिर्यादी विश्वास यांच्या गावाकडील राहणारे आहेत. त्यांनी फिर्यादी विश्वास यांचा विश्वास संपादन करून गावाकडून कमी दरात बासमती तांदूळ व बटाटा खरेदी करून त्याची शहरात विक्री केल्यास जादा नफा मिळेल असे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादी विश्वास यांच्याकडून नऊ लाख 30 हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीस चिकन सेंटर सुरू करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 20 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपी सरफराज त्याच्या खात्यावर 15 लाख 30 हजार रुपये घेतले. अशाप्रकारे आरोपी भावांनी फिर्यादी यांची 24 लाख 80 हजार रुपये घेऊन पळून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button