ताज्या घडामोडीपुणे

तोतया वकिलाकडून बांधकाम व्यावसायिकाची 10 लाखांनी फसवणूक

पुणे | वकील नसतानाही वकील असल्याचे भासवून पुण्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला दहा लाख रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेश उर्फ बॉबी बजाज आणि बापू गोरख शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 59 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे शिवाजीनगर परिसरातील एक नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपी राजेश बॉबीने तो वकील नसतानाही पियादिना वकील असल्याचे सांगितले आणि त्यांच्या वतीने सिव्हिल कोर्टात कोर्ट पीएमसी येथे बनावट वकील पत्र दिले.

दरम्यान, या बदल्यात आरोपीने फिर्यादी कडून नऊ लाख 90 हजार रुपये फी घेतली, तर फिर्यादी यांच्या एका फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेऊन त्यात स्वतःचे सामान ठेवले. दुसरा आरोपी बापू शिंदे याने फिर्यादी कडे पन्नास लाख रुपये दे अथवा एक ऑफिस ते या स्वरुपात खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी सुद्धा दिली.

या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button