breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना महामारीत होतेय फसवणूक; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘या’ ‘हेल्पलाइन’वर करा तक्रार

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना महामारीचा गैरफायदा घेत नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णवाहिका चालक अवाजवी दर आकारत असतील. रेमडेसिविर किंवा इतर औषधांचा काळाबाजार होत असेल, कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अवाजवी पैशांची मागणी होत असेल, तर या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवता येणार आहे. त्यावरुन संबंधितांवर पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहेत.

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून महासेतू सोल्युशन्स एलएलपी, ग्लोबल हयुमन ऑरगनायझेशन यांच्या समन्वयातून ‘पोलीस सॅमरिटन’ ही हेल्पलाइन शनिवारपासून (दि. १५) कार्यान्वित करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिक त्यांच्या समस्यांबाबत हेल्पलाइनवर फोन करू शकतात. कोविड पॉझिटिव्ह असताना रुग्ण घराबाहेर वावरत असेल. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल, वेळेची मर्यादा न पाळता परवानगी नसलेली दुकाने, हॉटेल, आस्थापना सुरू असतील, अशा बाबतीत नागरिक हेल्पलाइनवर तक्रार नोंदवू शकतात.

महामारीच्या काळात नागरिकांची फसवणूक होत आहे. त्याबाबत कुठे तक्रार करावी, याबाबत नागरिकांना माहिती नसते. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिक त्यांच्या तक्रारी मांडू शकतात.
– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

या क्रमांकावर साधता येईल संपर्क
८०१०४३०००७
८०१०८१०००७
८०१०४६०००७
८०१०८३०००७

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button