पिंपरी / चिंचवड

फसवणूक प्रकरणी फायनान्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

फसवणूक केल्या प्रकरणी आय आय एफ एल फायनान्स प्रा ली कंपनी चिंचवड आणि आय आय एफ एल कंपनीचे क्रेडिट डिपार्टमेन्टचे राहुल रमेश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रुबल सतीश धूत (वय 28, रा. सहकारनगर, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आय आय एफ एल या फायनान्स कंपनीने फिर्यादी, फिर्यादीचे वडील सतीश धूत, आई इंदू धूत, भाऊ शुभम धूत यांना कोंढवा येथील एक फ्लॅट घेण्यासाठी एक कोटी एक लाख 50 हजार रुपये कर्ज मंजूर केले. कर्ज घेतेवेळी फिर्यादी यांचे आयसीआयसी लोम्बार्ड आणि प्रोडंशियल कंपनीचा इन्शुरन्स काढून देतो म्हणून कंपनीच्या इन्शुरन्स पेपरवर सह्या घेतल्या. सदर कंपनीचा इन्शुरन्स फिर्यादी यांना दिला नाही.

तसेच टाटा ए आय जी कंपनीच्या इन्शुरन्सच्या पेपरवर फिर्यादी, त्यांचे वडील, आई आणि भाऊ यांच्या खोट्या सह्या करून टाटा ए आय जी कंपनीचा इन्शुरन्स काढून फिर्यादी यांची फसवणूक केली. पाच ऑक्टोबर 2021 रोजी फिर्यादी यांच्या पत्त्यावर ए आय जी कंपनीने पोस्टाद्वारे पॉलिसी रद्द केल्याचे कागदपत्र पाठवले. पॉलिसी रद्द केलेल्या कागदपत्रांवर फिर्यादी व घरच्यांनी विनंती केल्याने पॉलिसी रद्द केली असे कारण होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button