breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोना नियमांच्या चौपट गर्दी; मालाडच्या ‘डी मार्ट’वर सील कारवाई

मुंबई – मुंबईच्या मालाड (पश्चिम)मधील लिंक रोडवरील ‘डी मार्ट’ स्टोअरमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांची ऐंशी की तैशी झाल्याचे दिसून आले आहे. एकावेळी निर्धारित १५० ग्राहकांना परवानगी असताना तब्बल ६०० म्हणजे चौपटीने ग्राहकांची गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयाने हे डी मार्ट काल सील केले. याप्रकरणी या डिपार्टमेंटल स्टोअरचे व्यवस्थापक आशिष देशमुख यांना नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील देण्यात आले असल्याची माहिती पी/ उत्तर मालाडचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली.

महापालिकेच्या पथकाने काल अचानक तपासणी केली असता मालाडच्या लिंक रोडवरील डी मार्ट स्टोअरमध्ये उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. डी मार्टच्या कर्मचाऱ्यांनी, विशेषतः बिल काऊंटरवरील कर्मचाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे यांचा वापर केलेला नसल्याचे आढळले. तसेच कर्मचारी आणि ग्राहक सर्वजण वावरत असताना सुरक्षित अंतराचे नियम पाळत नसल्याचेही निदर्शनास आले. एकाचवेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उपस्थिती नियमाचादेखील तिथे भंग केला गेला. यास डी मार्ट व्यवस्थापन कारणीभूत ठरलेले आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

एकूणच, कोविड प्रतिबंधक नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने डी मार्ट पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आले आहे. डी मार्टच्या संबंधित व्यवस्थापकास नियमभंगाबाबत नोटीस बजावून, परवाना रद्द का करण्यात येऊ नये, याविषयी तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील पी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button